चारही राजकुमार आता रांगायला लागले. राजा दशरथ आणि तिन्ही राण्या त्यांच्या बाललीलांमध्ये दंग रंगून जात. रामाचे आणि राजकुमारांचे बालपण संपूच नये असे दशरथाला वाटत होते पण आता राजकुमार सहा वर्षांचे झाले. त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे राम आणि भावंडे गुरुग्रही शिक्षणासाठी गेली. महर्षी वशिष्ठांनी त्यांना शस्त्र विद्या, राज्यशास्त्राचे शिक्षण दिले. सर्व राजकुमार शस्त्रविद्येत पारंगत झालेत पण त्यांना धनुर्विद्या जास्त प्रिय होती. गुरुगृहातील शिक्षण पूर्ण करून प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येला आले. एक दिवस राज्यसभेमध्ये राजा दशरथ, गुरु वशिष्ठ आणि मंत्रीगण आपापल्या स्थानावर विराजमान होते. तेवढ्यात द्वारपालाने ‘महर्षी विश्वामित्र’ आल्याची वर्दी दिली. दशरथ राजा अतिशय विनयाने आणि नम्रतेने विश्वामित्र ऋषींना राज्यसभेत येण्याचे प्रयोजन विचारतात आणि राजा, आपली मनोकामना मी पूर्ण असे वाचन देतात.
#LokmatBhakti #JaiShriRam #Ramayan #Ramayankatha #Ram #Laxman #Seeta
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा